Total Pageviews

Thursday, 23 March 2017

अनधिकृत घरे... सिव्हिल इंजिनिअरची गरज नाय फूट तू !!

सिव्हिल इंजिनिअर... एक ग्वाड गैरसमज...
सिव्हिल इंजिनिअर होताना आपण भाबडे लई भारावून गेलेले असतो, आपल्याला या क्षेत्रात कामच काम आहे असे वाटत असते, ख्या... ख्या....ख्या. 
विटा लावायला गवंडी आणि बाया लागतात, पण सिव्हिल इंजिनियर कशाला लागतोय  बोंबलायला !!
विंजिनेर झालात ना तर गप ज्या काय क्लासची मिळते ती, किंवा लोकल बॉडी जसे जिल्हा परिषद, नगर/महानगर पालिका, इथे शहाण्यासारखे चिकटून जावे व आयुष्यभर कोंदट वास आणि पगार/वर कमाई जे काय असेल ते घेऊन वर्षातून १ नाहीतर ४ वेळा थायलंडची ट्रिप करावी. हातातली  कामे टाळत-टाळत करावीत. कामे संपली तर नोकरी जाईल हे लक्षात राहू द्यात. शिवाय तुम्ही कामे केलीत म्हणजे जग चालते असे नाही. लोकांना घर पायजे घर... ते झोपडं बांधतील नायतर कर्ज काढतील व फेडत बसतील, तुम्हाला जमते झेपते तेव्हढेच काम करा!! दुणीवेची चिंता करू नका. 
बाकीच्यांनी.....
उगीच-च्या उगीच मी फ्रिलान्स विंजिनेर बनणार म्हणून कायच्या काय स्वप्ने बघू नाहीत.. उपाशी राहायची कामे आहेत ती!!
सिव्हिल विंजेनरच्या ड्युटी... 
शिट्ट्या मारत पोरी पटवत फिरणे हि खरी सिव्हिल विंजिनेरची ड्युटी, निदान शाळा-कॉलेजात तरी हाच फंडा होता. रोज ४ वेळा तिच्या दारातून जाता येताना "एक झलक" साठी हेलपाटे मारायचो किनई. आणि मग तो रोमांच मिळायचा !! मग इथेही " कर्मण्ये वाधी का? रस्ते ... sssss वगैरे ध्यानात ठेऊन जो रस्ता त्यावर जी पोरगी असेल ती गोड मानून पुढे जावे, जावे म्हणजे पटली तर ग्रेट आणि हीच आपली कमाई. खबरदार हि कमाई घरी अजिबात अनु नाई !!!
बिगरशेती विभागातील भरगच्च कारकून मुलगी हि जरी खूप गोड हास्य देत असेल तरी त्या मायाजालात फसू नये. ती गाडी आपल्यासाठी नाही. ती नुसती शोरूमला पार्क करून ठेवली आहे!!

तर सांगायचे तात्पर्य हेच कि, हेलपाटे घालणे, हि सिव्हिल विंजिनेरची ड्युटी, आणि हेलपाटे  घालताना एखादी येडी पोरगी चुकून  पटलीच तर ती आपली सुखद कमाई... अमुक रुपये पगार इन k हे थोतांड आहे ते तुमच्यासाठी नाही!!

तुम्ही सामान्य ना
कुठल्याही सरकारी ऑफिसात जर तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या हक्काचे काहीतरी कागदी  प्रमाणपत्र, दाखला.....  प्लॅन सॅंक्शन हुश्श !!!! घ्यायला गेला असाल तर सावध राहा. 
तुम्हाला साधारणतः एक कागूद मिळायला १ ते दीड वर्ष सहजच लागू शकतात. 
इकडे विलेक्षन ड्युटी, मोठ्या साहेबांची मिटिंग, साईटवर जाणे अशी ब्रह्मदेवाच्या बापाला न जमणारी कामे एकटा सरकारी वा पालिकेचा विंजिनेर करत असतो त्यामुळे तो त्याच्या जागेवर कधीच सापडत नाही. सापडला तर मोठा घोळका जमा होतो मग त्याची लाईन बनते ती संध्याकाळी ५ ला संपते!!
तुमचा नंबर आला कि साहेब असंख्य चोपड्या काढून "पूर्ण अभ्यास करून" काही गडबड तर नाही ना हे २१ वेळा (२१ हा आपला धार्मिक दृष्ट्या शुभ अंक आहे त्यात संकष्टी/विनायकी अली कि घोच समजा...  ह्या ह्या ह्या... हे उगाचच ) कारण समोर गणपती, साईबाबा किंवा तत्सम फोटो असतो म्हणून ते तसे चेक करून घेतात. 
इतका वेळ नसेल तर पुढच्या आठवड्यात या हे उत्तर ठरलेलेच असते. 

मी पुण्यातील माझी जागा बिगरशेती करण्यासाठी ४ वर्षे सिव्हिल विंजिनेर बनलो, मग नगरपालिका प्लॅन सॅंक्शनसाठी पुढचे ४ वर्षे. यात कमाई शून्य!! उलट फ्या व पदरचे पैसे वरचे म्हणून द्यायला लागले. 
फक्त ती भरगच्च स्टेनो बाकी वा... पण फक्त  शोरूमला... टेस्ट ड्राइव्ह बी नाय साला!!

नंतर जेव्हा विंजिनेर लायसनला कागूद घिऊन गेलो, तेव्हा हे कहार !!
त्यातील यक लायसन फकस्त रिनिव्ह करायचे होते, बाबाने २०१७ ची नियमावली कि निय"माउली " काय ते काढले आणि चक्क ओरडला, तुम्ही यमी सिव्हिल हाय का? नाही ना मग निघा.... 
च्यायला... 
च्यायला..... 
च्यायला .......
मंग मी बी १२चाच कि, म्हटलं  पुण्यामंदि जी समदी यमी नाईत त्येंना बी बाद कर भो!!
जे त्यांनी त्वांड खाली घातले नि तिथूनच पुटपुटला पुढच्या आठवड्यात या. 
असे तारीख पे तारीख... तारीख पे तारिख..... होत होत ७ महिने उलटले, मला जे विंजिनेरचे लायसन हवे होते ते आजतागायत मिळाले नाही. कारकून विलेक्षण ड्युटीला, मोठा साहेब मुतायला, (हागत नसावा नायतर ऍडमिट केल्याची बातमी कळली असती), जेवायला, साईटवर, मोठ्या साहेबांबरुबर मीटिंगला, पण जागेवर कधीच नाही.

मी शासकीय अभियांत्रिकी पुणे ह्या घाणेरड्या आणि बाद कॉलेजातून बाहेर पडलो, २१ वर्षे शिट्ट्या मारायचा अनुभव घेतला तरीही "लायसन नही देनेका " वो क्या ऐरागैरा लायसन है क्या ? किसभि येडेकू देदो ? ..... तर हे आपले सरकारी कामकाज

एका इंजिनिअरला लोकांचे प्लॅन सॅंक्शन करून घ्यायचे लायसन मिळाताना हि अवस्था, तो प्लॅन तिथे  टाकल्यावर त्यातील अनेक बारकावे कायदेशीर बाबी समजून घेण्यात किती वेळ घेतला जाईल?  आग बाबव sssss..


हे सगळे शासकीय नाटक बघून लोक एकतर अनधिकृत घरे बांधतात, किंवा बिल्डर व त्यांचे आर्किटेक्ट ह्यांची सरकारी बाबूबरोबर साखळी बनली आहे त्यांच्या समस्त साखळीच्या मढ्यावर पैसे ओतून कर्ज काढून लाखो रुपये २०-२० वर्षे फेडतात व मरमर करून ते कर्ज फेडतात. त्या घरात राहिल्याचा आनंद मिळवतात. 

हे सरकार काय करते व करत आलेय? लाखो लोक बेरोजगार आहेत त्यांना किमान वेतन पगारावर वरील कामे करायची परवानगी का दिली जात नाही? आज  वर्षाला लाखभर यमी/बीई  विंजिनेर मार्केटमध्ये येतात. त्यांना कामाला लावायची आपल्या सरकारची इच्छा नाही. दात कोरून पॉट भरत राहणार हे. आणि स्वप्ने मेक इन इंडियाची... सगळे झ्याट
 
  
 

No comments:

Post a Comment